हर्षवर्धन जाधव हे पुन्हा मनसेच्या इंजिनगाडीमध्ये....

Foto
औरंगाबाद -  बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेचा रविवारी महामोर्चा आयोजित केला आहे. दरम्यान, या महामोर्चापूर्वी मनसेमध्ये मोठ्या प्रमाण मेघाभरती सुरु केली आहे .
मुंबई आणि इतर देशभरातील भागात घुसलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेने रविवारी महामोर्चा आयोजित केला आहे. दरम्यान, या महामोर्चापूर्वी मनसेमध्ये मोठ्या प्रमाण इनकमिंगला सुरुवात झाली आहे. आज कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत औरंगाबाद मधील शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी मनसेत प्रवेश केला. 

 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश... 

भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. 
हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन हे आधी मनसेमध्ये होते. हर्षवर्धन जाधव हे २००९ साली मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. मधल्या काळात अंतर्गत वादामुळं शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. तसंच, औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला खरा, मात्र त्यांनी तीन लाखांच्या जवळपास मतं घेतली. त्यांच्या या मुसंडीमुळं शिवसेनेचे दिग्गज नेते खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचा उमेदवार निवडून आला. तेव्हापासून खैरे व जाधव यांच्यात वाद निर्माण झालेला आहेत. दोघेही एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत.


दरम्यान,  पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी मोर्चाचे आयोजन केले आहे. पक्षाने हिंदुत्वाचे वळण घेतल्यानंतरचा हा पहिलाच मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. 

रविवार, ९ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून, आझाद मैदान येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाने मोर्चाची सांगता होईल. या मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी मनसेने केली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker